|
निसर्गरम्य परिसरात आपलं घर असावं, नेत्रसुखद असा परिसर नजरेत भरून घेत छान हुरड्याचा अन् भोजनाचा आस्वाद घेत आयुष्यातील काही क्षण घालवावेत व आपल्या जगण्याचा खरा आनंद घ्यावा असे प्रत्येकालाच कधी ना कधी मनात कुठेतरी वाटत असते. असे वाटणार्यासाठी आणि ज्याला स्वतःची शेती असूनही काही गोष्टींमुळे या क्षणाचा आनंद घेता येत नाही अशांच्या सोयीसाठी आपण काहीतरी करावं आणि आपल्या घासातला घास अशांना भरवून या निसर्ग भोजनाचा आनंद सर्वांना वाटावा. ही एक सर्वसाधारण संकल्पना घेवून श्री. राजू यांनी छोट्या प्रमाणात फक्त हुरड्याच्या मौसमामध्ये हुरडा पार्टी म्हणून सुरुवात केली आणि अभिषेक मळ्याची निर्मिती झाली. पुर्वी मुबलक हुरडा उपलब्ध असल्याने तसेच माणूसकीच्या नात्याने मनसोक्त हुरडा खायला मिळायचा, नव्हे आग्रहाने, आदराने एकमेकांकडे ही हुरडा पार्टी चालायची. कालांतराने यात फरक पडला. तेव्हा माणूस माणसापासून दूर होत गेला. माणूसकी दुरावत चालली. अन् आपल्याला कोणीतरी हुरड्यासाठी बोलावले का? म्हणत अनेक मौसम वाया घालवयाची वेळ आली आणि अशांसाठी आपला मळा म्हणून हक्काचा, आदराचा वाटू लागला ते म्हणजे अभिषेक मळा कृषी पर्यटन केंद्र. |
|